दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ बांगलादेश क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२४ दरम्यान बांगलादेशचा दौरा करत आहे. या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) या दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.
२३ सप्टेंबर २०२४ रोजी, क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने सांगितले की ते बांगलादेशमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत समाधानी आहेत. त्यानंतर ३० सप्टेंबर २०२४ रोजी, सीएसएने कसोटी मालिकेसाठी बांगलादेशला जाण्याची पुष्टी केली.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२४-२५
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?