द काश्मीर फाइल्स

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

द काश्मीर फाइल्स हा इ.स. २०२२ मधील विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित, झी स्टुडिओज निर्मित हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात जम्मू आणि काश्मीर मधील उग्रवादा दरम्यान पीडित काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराचे चित्रण दाखवल्या गेले आहे. यात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट सुरुवातीला २६ जानेवारी २०२२ रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने जगभरात प्रदर्शित होणार होता, परंतु ओमिक्रॉन प्रकाराच्या कोरोनाच्या प्रसारामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. नंतर ४ मार्च २०२२ रोजी या चित्रपटाचे विशेष प्रीमियर होते. परंतु एका भारतीय जवानाच्या विधवेने दाखल केलेल्या खटल्याच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर, या चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले होते. ठराविक दृश्यांवर कात्री लावून हा चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी मिळाली. शेवटी ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट विविध चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनाच्या अवघ्या तीन दिवसात हा चित्रपट हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक मध्ये करमुक्त घोषित करण्यात आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →