विवेक रंजन अग्निहोत्री (२१ डिसेंबर, १९७३ - ) हा एक भारतीय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, लेखक आणि कार्यकर्ता आहे. हा २०१९पर्यंत भारताच्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या बोर्डाचे सदस्य होता तसेच इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्समध्ये भारतीय सिनेमाचे सांस्कृतिक प्रतिनिधी आहेत. ताश्कंद फाइल्स (२०१९) या चित्रपटा साठी त्याला सर्वोत्कृष्ट पटकथा-संवादांचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. अग्निहोत्रीने जाहिरात एजन्सींमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि दूरचित्रवाणीमालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्याने गुन्हेगारीवर आधारित चॉकलेट (२००५) हा पहिला बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शित केला.
अग्निहोत्री यांना माध्यमांनी वारंवार उजव्या पक्षाशी जोडले आहे. त्यांनी मोदी सरकारचा खंबीर समर्थक असल्याचा दावा केला आहे . अग्निहोत्री भाजपा सरकारच्या विरोधकांचा अर्बन नक्षल असा उल्लेख करतो.
विवेक अग्निहोत्री
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.