थरिंदु रथनायके

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

थरिंदू रथनायके (जन्म १८ एप्रिल १९९६) हा एक श्रीलंकाई ​​क्रिकेटपटू आहे. त्याने २६ डिसेंबर २०१३ रोजी २०१५-१६ च्या प्रीमियर लीग स्पर्धेत 'सिंहलीज स्पोर्ट्स क्लब'कडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मार्च २०१८ मध्ये, २०१७-१८ च्या 'सुपर फोर प्रोव्हिन्शियल टूर्नामेंट'साठी डंबुलाच्या संघात त्याची निवड करण्यात आली होती.

२०१८-१९ च्या प्रीमियर लीग स्पर्धेत सिंहलीज स्पोर्ट्स क्लबसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज तो ठरला; त्याने दहा सामन्यांत ५३ फलंदाजांना बाद केले. ऑक्टोबर २०२० मध्ये, लंका प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी कोलंबो किंग्सने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. मार्च २०२१ मध्ये, २०२०-२१ ची एसएलसी ट्वेंटी-२० स्पर्धा जिंकणाऱ्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या संघात तो सहभागी होता; २००५ नंतर या क्लबने ही स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती.

नोव्हेंबर २०२१ मध्ये, २०२१ च्या लंका प्रीमियर लीगसाठी झालेल्या खेळाडूंच्या निवडीनंतर त्याची डंबुला जायंट्सकडून खेळण्यासाठी निवड झाली. जुलै २०२२ मध्ये, लंका प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी डंबुला जायंट्सने त्याला करारबद्ध केले.

त्याने १७ जून २०२५ रोजी बांगलादेश विरुद्ध मालिकेमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये तर १७ सप्टेंबर २०२६ रोजी इंग्लंडविरुद्ध मालिकेमधून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →