तोल्याती (रशियन: Тольятти) हे रशिया देशाच्या समारा ओब्लास्तामधील एक प्रमुख शहर आहे. कोणत्याही प्रांताचे मुख्यालय नसलेले तोल्याती हे रशियामधील सर्वात मोठे शहर आहे. तोल्याती शहर रशियाच्या दक्षिण भागात मॉस्कोच्या १००० किमी आग्नेयेस वोल्गा नदीच्या काठावर वसले आहे. समारा ओब्लास्ताची राजधानी समारा तोल्यातीच्या ९५ किमी आग्नेयेस स्थित आहे. २०१८ साली तोल्यातीची लोकसंख्या सुमारे ७ लाख इतकी होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तोल्याती
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.