तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक

तिरुवनंतपुरम सेंट्रल हे केरळच्या तिरुवनंतपुरम शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. केरळमधील सर्वात वर्दळीचे असलेले तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दक्षिण रेल्वेच्या तिरुवनंतपुरम विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे.

उत्तरेकडून कोचीमार्गे केरळकडे धावणाऱ्या गाड्या तसेच दक्षिणेक्डून कन्याकुमारीमार्गे धावणाऱ्या गाड्या तिरुवनंतपुरममध्ये थांबतात. कोकण रेल्वेमुळे दिल्ली तसेच मुंबई शहरांहून तिरुवनंतपुरमकडे जाणाऱ्या गाड्यांचे अंतर कमी झाले आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे कोचुवेली नावाचे नवे स्थानक उघडण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →