कोचुवेली हे केरळच्या तिरुवनंतपुरम शहरामधील एक रेल्वे टर्मिनस आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी २००५ साली कोचुवेली स्थानक उघडण्यात आले.. हे स्थानक शहराच्या उत्तर भागात स्थित असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ वरील बाह्यवळण मार्ग येथून जवळ आहे. येथून कोकण रेल्वेमार्गे मुंबई, दिल्ली व उत्तरेकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात.
या स्थानकाला पूर्वी द्वार आणि पश्चिमी द्वार अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. पूर्व बाजूला रेल्वे टर्मिनल आहे जिथून कोचुवेली स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या जातात. सध्या तेथून ११ लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस तर १ पॅसेंजर गाडी सुटते. कोचुवेली रेल्वे स्थानक प्रवाशांना भारतातील महत्त्वाच्या शहरांशी जोडते. बहुतेक गाड्या ज्या आता त्रिवेंद्रम सेंट्रल स्थानकावरून सुटतात (साबरी एक्सप्रेससह) त्या संपूर्ण काम झाल्यानंतर कोचुवेली स्थानकावरून सुटतील. गर्दीच्या काळात येथून काही विशेष गाड्यासुद्धा सुटतात. येथून नवी दिल्ली, हैदराबाद, बिलासपुर, यशवंतपूर, दादर, नवी तिनसुकिया, संत्रागाची आणि चेन्नई साठी गाड्या सुटतात. पश्चिम बाजूला जुने रेल्वे स्थानक आहे.
कोचुवेली रेल्वे स्थानक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.