ताबास्को (संपूर्ण नाव: ताबास्कोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Tabasco) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. हे राज्य मेक्सिकोच्या आग्नेय भागात स्थित असून
त्याच्या उत्तरेस मेक्सिकोचे आखात, पूर्वेस ग्वातेमाला देश तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. व्हियाएर्मोसा ही ताबास्को राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
ताबास्कोचा मोठा भाग जंगलाने व्यापला असून येथील भूभाग अनेकदा पूराने भरतो. येथील अर्थव्यवस्था कमकूवत असून खनिज तेल व कृषी हे प्रमुख उद्योग आहेत. कोको ह्या फळाचा शोध ताबास्कोमध्येच लागला होता.
ताबास्को
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.