गेरेरो

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

गेरेरो

गेरेरो (संपूर्ण नाव: गेरेरोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Guerrero)हे मेक्सिको देशाच्या दक्षिण भागातील एक राज्य आहे. गेरेरोच्या दक्षिणेस प्रशांत महासागर तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. शिल्पांसिंगो ही गेरेरोची राजधानी तर आकापुल्को हे सर्वात मोठे शहर आहे.

१८४९ साली स्थापन झालेल्या गेरेरो राज्याला मेक्सिकोचा स्वातंत्र्यसेनानी व दुसरा राष्ट्राध्यक्ष व्हिसेंते गेरेरो ह्याचे नाव दिले गेले आहे. पर्यटन हा गेरेरोमधील सर्वात मोठा व्यवसाय असून आकापुल्को हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.

सध्या येथील अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांमुळे गेरेरो हे मेक्सिकोमधील सर्वात धोकादायक राज्य मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →