च्यापास

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

च्यापास

च्यापास (संपूर्ण नाव: च्यापासचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Chiapas)हे मेक्सिको देशाचे सर्वात दक्षिणेकडील राज्य आहे. च्यापासच्या पूर्वेस ग्वातेमाला, दक्षिणेस प्रशांत महासागर तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. तुत्स्ला गुत्येरेस ही च्यापासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत नोंद असणाऱ्या च्यापासमध्ये माया संस्कृतीमधील अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. येथे अनेक वंशाचे स्थानिक अदिवासी स्थित आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →