ताफाद्झवा त्सिगा (जन्म १३ जुलै १९९४) हा झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो. संघामध्ये तो यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळतो.
त्याने २४ फेब्रुवारी २०१४ रोजी २०१३-१४ च्या लोगन कप स्पर्धेत 'सदर्न रॉक्स'कडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.फेब्रुवारी २०१७ मध्ये, त्या वर्षाच्या उत्तरार्धात इंग्लंडचा दौरा करणाऱ्या झिम्बाब्वे क्रिकेटच्या अकादमी संघात त्याची निवड करण्यात आली.
४ फेब्रुवारी २०२३ रोजी त्सिगा याने वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण केले.
ताफाद्झवा त्सिगा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?