तलाठी कोतवाल

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

महसूल कोतवाल हा गावातील तलाठी यांनी सांगितलेली कामे तसेच गौणखनिज देखरेख करतो.



भारतामध्ये कोतवाल हे पद मोगल कालखंडामध्ये गावातील प्रशासन चालविण्यासाठी निर्माण करण्यात आले.



कोतवालाची नेमणूक तहसीलदार (मामलेदार) करतो.

प्रत्येक साझा साठी एक कोतवाल असतो.

कोतवाल म्हणजेच महसूल सेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार तहसिलदारास आहेत.

कोतवालाचे मानधन दि.०१ जानेवारी २०१२ पासून दरमहा ₹५०१०/- इतके करण्यात आले आहे.

महसूल सेवक हा पूर्णवेळ काम करणारा कनिष्ठ ग्रामीण नोकर आहे व त्या संबधीत गावात राहणे बंधनकारक असते.

तो गावामध्ये २४ तास शासकीय सेवेस बांधील असतो.

सुरुवातीला कोतवाल या पदासाठी वंश परंपरा होती, परंतु १९५९ पासून राज्यातील वंश परंपरागत किंवा वतनी गावकामगारांची नियुक्ती रद्द करण्यात आली.

सध्या महाराष्ट्रामध्ये १३,६३६ पेक्षा अधिक कोतवाल कार्यरत आहे.

कोतवाल पदनामात बदल करून महसूल सेवक असे नामकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४ रोजी घेतला आहे.

जिल्हास्तरीय महसूल (प्रशासन) यंत्रणा:

जिल्हाधिकारी

|

प्रांत अधिकारी

|

तालुका दंडाधिकारी

|

नायब तहसीलदार

|

महसूल मंडळ अधिकारी

|

तलाठी

|

महसूल कोतवाल/सेवक



महसूल सेवक (कोतवाल) संख्या :

महसूल सेवकाची संख्या गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते.

गावाची लोकसंख्या कोतवाल

१००० पर्यंत १,

१००१ ते ३००० पर्यंत २,

३००१ ते पुढे ३.



एखाद्या गावात ३ पेक्षा अधिक कोतवाल म्हणजेच महसूल सेवक नेमण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यास असतो, परंतु त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →