तलाठी (महाराष्ट्र, गुजरात) किंवा कर्णाम् (आंध्र प्रदेश), पटवारी (मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगणा, पश्चिम बंगाल), कर्नाटकात ग्राम-लेखापाल (Village Accountant), लेखपाल (उत्तर प्रदेश, उत्तराखंड) तर पिल्लई तमिळनाडूत अश्या विविध नावांनी भारतीय उपखंडात ओळखला जाणारा ग्रामीण भागात कार्यरत असणारा सरकारी कर्मचारी आहे.
१६ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सुरू करण्यात आलेला हा कर्मचारी आहे, पुढे तो ब्रिटिश राजवटीत देखील कामावर होता.
हा अधिकारी राज्याचा प्रतिनिधी म्हणून जमिनीच्या नोंदी, शेतीच्या नोंदी ठेवण्यासाठी आणि कर गोळा करण्यासाठी आणि काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये महसूल पोलीस म्हणून काम करण्यासाठी जबाबदार आहे जिथे त्यांना विशेष अधिकार क्षेत्र देण्यात आले होते.
महाराष्ट्रात तलाठ्यांना आता ग्राम महसूल अधिकारी(V.R.O.) असेही संबोधण्यात येते.
जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत, गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ प्रकारच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो.
तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो.
तसेच गावातील शेत जमिनीचा सातबारा(७/१२), ८-(अ) यांसह ईतर सर्व बाबींचा तलाठी अहवाल/दाखले देत असतो.
तलाठी
यामागील विज्ञान आणि इतिहास.