पोलीस पाटील

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

पोलीस पाटील पदासाठी महिलांना व विविध इतर जातीधर्मातील सर्व घटकांना आरक्षण देण्यात आले, यामुळे अनेक अनुसूचित जातीच्या उमेदवारांना व महिलांना पोलीस पाटील होण्याची संधी मिळाली आहे. पोलीस पाटील भरतीमध्ये लेखी परिक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून निवड करण्यात आली. यामुळे उच्चशिक्षित युवक व गुणवत्तापूर्ण पोलीस पाटलांची मोठ्या प्रमाणात निवड झाली आहे. नवीन पोलीस पाटील भरतीमध्ये बी.ए., एम.ए., इंजिनिअर, डीएड झालेले उमेदवार पास झालेले असून त्यांना फक्त 100 रुपये रोजंदारीवर २४ तास काम करावे लागत आहे. पोलीस पाटील पद स्वीकारल्यास खाजगी नोकरी करता येत नाही, २४ तास गावामध्ये राहावे लागते, गाव सोडून जाता येत नाही. पोलीस पाटलांच्या मानधनात अपेक्षित वाढ व्हावी, तसेच शासनाच्या इतर भरतीमध्ये पोलीस पाटलांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात याव्यात.‌ पोलीस पाटील हा प्रशासन व गावकरी यांच्यातील दुव्याचे महत्त्वपूर्ण काम करत आलेला आहे व यापुढेही प्रामाणिकपणे करत राहील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →