डुइसबुर्ग (जर्मन: Duisburg) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे. हे शहर पश्चिम रूर भागात ऱ्हाईन व रूर नद्यांच्या संगमावर वसले असून ते ड्युसेलडॉर्फ महानगराचा एक भाग आहे. ऐतिहासिक काळापासून लोखंड उत्पादन व्यवसायाचे डुइसबुर्ग हे जर्मनीमधील सर्वात मोठे केंद्र राहिले आहे. ह्या कारणास्तव दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांकडून येथे मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले झाले ज्यामध्ये शहराचा ८० टक्के भाग जमीनदोस्त झाला होता.
सध्या सुमारे ४.९ लाख लोकसंख्या असलेले डुइसबुर्ग नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील पाचवे तर जर्मनीमधील १५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
डुइसबुर्ग
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?