डीसी कॉमिक्स, इंक. ही एक अमेरिकन कॉमिक पुस्तकांची प्रकाशन कंपनी आहे. ही कंपनी डीसी एन्टरटेनमेंटचा प्रकाशन विभाग आहे, डीसी कॉमिक्स वॉर्नर ब्रदर्स ग्लोबल ब्रँड अँड एक्सपीरियन्सची उपकंपनी आहे. डीसी कॉमिक्स ही सर्वात मोठी आणि सर्वात जुनी अमेरिकन कॉमिक बुक कंपन्यांपैकी एक आहे. डीसी विश्वातील अनेक काल्पनिक व्यक्तिरेखा, खासकरून सुपरमॅन, बॅटमॅन आणि वंडर वूमन सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठरल्या आहेत. या विश्वात लेक्स लूथर, जोकर, कॅटवुमन आणि पेंग्विन सारखे खलनायक देखील आहेत. कंपनीने डीसी विश्वाशी निगडीत नसलेली प्रकाशने सुद्धा केली आहे, यात वॉचमेन, व्ही फॉर व्हेंडेटा, फॅबल्स, इ.चा समावेश आहे..
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डीसी कॉमिक्स
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.