डार्थ व्हेडरचा पुतळा हा प्लॅस्टर आणि टायटॅनियमच्या मिश्र धातूंचा पुतळा आहे. हा ओदेसा, युक्रेन येथे आहे जो डार्थ व्हेडर ह्या स्टार वॉर्स चित्रपट व पुस्तकमालिकेतील महत्त्वाचे पात्राला दर्शवतो. मुळतः हा व्लादिमिर लेनिन यांचा प्लॅस्टरचा पुतळा होता. २०१५ मध्ये शिल्पकार अलेक्झांडर मिलोव्ह यांनी युक्रेनमध्ये साम्यवादनिर्मूलनाचा भाग म्हणून याचे रूप पालटले व ह्याला डार्थ व्हेडरचे रूप मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डार्थ व्हेडर (पुतळा)
या विषयातील रहस्ये उलगडा.