ट्विन लेक्स ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील हिमनदीने कोरलेल्या अल्पाइन सरोवरांची जोडी आहे. ही सरोवरे लेडव्हिल शहरापासून १५ मैल (२४ किमी) दक्षिणेस आहेत. यातील पाणी क्रीक या उपनदी द्वारेआर्कान्सा नदीला मिळते. या सरोवरांचे क्षेत्रफळ २,७०० एकर (११ चौ. किमी). यातील पाणी फ्रंट रेंजमध्ये वापरले जाते.दोन्ही तलावांवर नौकाविहार आणि मासेमारी केली जाते.
या सरोवरांजवळ याच नावाचे गाव आहे. ट्विन लेक्स पोस्ट ऑफिसचा झिप कोड ८१२५१ आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २०४ होती.
१८६१ मध्ये स्थापित कॉलोराडोच्या मूळ १७ काउंटींपैकी एक असलेल्या लेक काउंटीला ट्विन लेक्सचे नाव देण्यात आले होते.
ही सरोवरे आणि गाव कॉलोराडो महामार्ग ८२ वर आहेत. हा रस्ता इंडिपेंडन्स पास ओलांडून पश्चिमेस ४० मैल (६४ किमी) ॲस्पेन आणि पुढे ग्लेनवूड स्प्रिंग्ज पर्यंत जातो. येथून जवळ असलेला यूएस २४ महामार्ग उत्तरेला लेडव्हिल आणि दक्षिणेला २० मैल (३२ किमी) ते बुएना व्हिस्टा कडे जातो..
ट्विन लेक्स (कॉलोराडो)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?