ट्रायडेंट हॉटेल

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ट्रायडेंट हॉटेल

ऑबेरॉय ट्रायडेंट भारतातील हॉटेलसाखळी आहे. भारतामधील काही शहरांमध्ये आणि जगामध्ये ऑबेराय समूहाच्या मालकीची हॉटेल्स आणि रिझोर्ट्स असून ऑबेराय आणि ट्रायडेंट ही दोन वेगवेगळी पंचतारांकित हॉटेल त्यांच्याकडून चालविली जातात. एकाच ठिकाणी ही दोन हॉटेल एकत्र असतात तेव्हा त्या समूहाला ऑबेराय ट्रायडेंट असे म्हणतात.

सुरुवातीच्या काळात ऑबेरॉय टॉवर्स किंवा ऑबेराय शॅरेटन या नावाने ही हॉटेल्स ओळखली जात होती. २००४ पासून एप्रिल २००८ च्या दरम्यान हिल्टन हॉटेल्स कॉर्पोरेशन आणि ऑबेरॉय हॉटेल व रिझोर्ट यांच्यामध्ये करार झाल्यावर ही हॉटेल्स हिल्टन हॉटेल्स म्हणून ओळखली जात होती. एप्रिल २००८ पासून ही हॉटेल्स ट्रायडेंट टॉवर्स म्हणून ओळखले जाते.

ऑबेरॉय हॉटेल आणि रिझॉर्ट्स आणि ट्रायडेंट हॉटेल मुंबईमध्ये नरीमन पॉइंट येथे असून ते ऑबेरॉय, मुंबई आणि ट्रायडेंट, नरीमन पॉइंट या नावाने ओळखली जातात. ऑबेरॉय हॉटेल्स आणि रिझोर्ट्सच्या मालकीची ही दोन्ही हॉटेल असून त्यांच्याकडून चालविली जातात. या दोन्ही हॉटेलच्या वेगवेगळ्या इमारती असून दोन्ही इमारती एका सामायिक रस्त्यानी जोडलेल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →