नागपूर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

नागपूर (इंग्रजी : Nagpur) हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील १३वे मोठे नागरी क्षेत्र (urban conglomeration) आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरात घेतले जाते.



भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड (नागपूर) आहे.

नागपूरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात, त्यामुळे येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे.

२००२ साली शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →