टाकळीभान

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

टाकळीभान हे नेवासा आणि श्रीरामपूर यांच्यामध्ये वसलेले एक गाव आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील राज्य क्र.४४ नेवासा श्रीरामपूर रोडवर श्रीरामपूरपासुन १५ किलोमीटर व नेवाशापासुन १८ किलोमीटरवर असलेले प्रती पंढरपूर म्हणून नावलौकिक असलेले टाकळीभान विठ्ठल मंदिर त्यातील मुर्ती यादवकालीन नाते सांगणारे विठ्ठल देवस्थान येथे सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीला मोठा उत्सव साजरा करण्यात येतो.

महाराष्टातील कोट्यावधी वारकर्याचे श्रद्धास्थान असलेले विठोबा माऊली सर्वञ दोन हाताच्या रूपात दर्शन देतो परंतु या विठ्ठल मंदिराचे वैशिष्ट म्हणजे येथील मुर्ती विठ्ठलाची ओळख असणारे दोन हात कमरेवर आहेतच परंतु आनखी दोन हात आसुन एका हातात चक्र तर दुसऱ्या हातात शंख असुन विठ्ठलाच्या गळ्यात वैजयंती माळ व जानवेही कोरलेले आहे. कमरेवर मेखला असुन दोन टांगी धोतर नेसलेले आहे मुखुटावर शाळुंकेसह शिवलींग व विशेष महत्त्वाचे म्हणजे या विठोबाला मिशा असलेली ही आगळीवेगळी मुर्ती असुन येथे एक शिलालेखही पहावयास मिळतो तसेच पंढरपूरात जसी रुखमिनी रुसुन लांब आहे तशी इथे ती एकाच शिळेवरती विठ्ठलाच्याच शेजारीच उभी आहे. असे हे आगळेवेगळे चतुर्भुज स्वरूप येथे प्रामुख्याने बघावयास मिळते.

सदर मंदिराला द.मा. मिराजदार, ग.दि माडगूळकर, शंकर पाटील , इतिहास संशोधक सुरेश जोशी, ब्रम्हानंद देशपांडे, अमेरिकन डॉ. एन. फेडहाऊस व या मूर्तीचा विशेष अभ्यास निवृत्त. शिक्षण उपसंचालक श्री. विष्णू जोशी यांनी केला आहे

यादवकाळामध्ये भानू नावाच्या राज्याची राजधानी टाकळीभान ही होती मुळातच सर्व धर्मीयांचा दैवत मानला जानारा विठ्ठल यादवकालीन राज्याचे कुलदैवत या भानू राज्याला विठ्ठलाने विष्णू रूपात दर्शन दिले होते.पण मंदिर त्याही अगोदरचे असल्याचे पुजारी सांगतात. इ.सन. ४००मध्ये भानू कुळाने पांडुरंग पल्लीत मुख्य स्थानावर पुषण (सूर्य) व विष्णू (विठ्ठल) या देवतेची एकञीत चतुर्भुज मुर्ती स्थापण केली होती. या मंदिराच्या देखभाली साठी ८८ एकर जमीन आहे. पण या दैवताचा उगम अद्यापही सापडलेला नसून पंढरपूर निवासाआधी कसा उत्क्रांत झाला याचा शोध अद्यपही अनुत्तरीत आहे. त्यामुळे विठ्ठलाचा अभ्यास करणारे देशी विदेशी संशोधक या मुर्तीचा आभ्यास करत आहेत.

पंढरपूर्व काळात महाराष्ट्र व कर्नाटक विठ्ठलोपासना सुरू होती परंतु अशा प्रकारचे चतुर्भुज रूप कुठेही पाहवयास मिळत नाही. मध्यप्रदेशामध्ये अशा प्रकारची मुर्ती इ.सन ४१०/१६ च्या आसपासची मुर्ती सापडते पण ही मुर्ती विठ्ठलाशी कसे नाते सांगते हेआद्यापहि उलगडलेले नाही. पण विठ्ठलाच्या उतक्रांतीत पंढरपुरचे महत्त्व वाढत गेले. आणी ह्या चतुर्भुज मुर्तीचे ध्यान लोप पावले असे संशोधकांचे मत आहे.

या देवस्थान मध्ये आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाई यांची विधीवत पुजा, अभिषेक होऊन विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.या निमित्ताने पंचक्रोशीतील वारकरी व भाविक पायी चालत येउन दर्शन घेतात. दिवसभर या ठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते . व आषाढ पोर्णिमेला गोपालकाला होउन सांगता होते.

संतांनी वर्णन केलेल्या या रूपाची मुर्ती असेल की त्यांच्या भावविश्वातील विठ्ठलाचे वर्णन हे नेमके सांगता येत नाही. पण तरिही येथील चतुर्भुज विठोबा माऊली काहितरी वेगळं सांगत टाकळीभान मध्ये उभा आहे.एवढे माञ निश्चित.......

मंदिरात वैशिष्ट्यपूर्ण विठुरायाची मूर्ती : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर-नेवासा महामार्गावर वसलेले टाकळीभान हे गाव प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. इथल्या यादवकालीन मंदिरातील या विठ्ठलाच्या मुर्तीमुळे मूळ वालुकामय असलेली मूर्ती आणि पंढरपुरातील मूर्ती एकाच काळात घडलेली असावी, असंही सांगितलं जातं. सध्या टाकळीभानमध्ये जे मंदिर आहे, त्यातील सभा मंडपात खाली असलेल्या बारवेतुन ही मूर्ती समोर आल्याचंही काहीजण सांगतात. मंदिराच्या गर्भगृहातील चौथऱ्यावर विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठलाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला मिशा, चार भुजा आहेत. यात दोन हात कमरेवर आणि दोन हातांत शंख व चक्र आहे तर मस्तकावर शिवपिंड, छातीवर कौस्तुभमणी अशी ही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे.

राजाच्या वास्तव्यामुळं गावाचं नाव टाकळीभान : यादवकाळात भान (भानू) नावाचा राजा पांडुरंगाचा भक्त होता. या गावाचं मूळ नाव 'टाकळी' असावं. भान राजाच्या वास्तव्यामुळंच या गावाचे नाव टाकळीभान पडलं, असं सांगितलं जातं. या गावातील चतुर्भुज विठ्ठलमूर्ती यादवकाळाच्या आधीची असल्याच अनेक इतिहास संशोधकांनी नमूद केलंय. या संदर्भातील पुरावा पंढरपुरात सापडलेल्या एका शिलालेखात मिळतो. भानू म्हणजेच यादवकालीन भान राजा असल्याचं सांगितलं जातं. अनेक संशोधकांनी या मूर्तीचा निर्माण कालावधी तब्बल 1,600 वर्षांपूर्वीचा असल्याचे दाखले दिले आहेत. याच गावात भानू राजाची राजधानी होती असा निष्कर्षही काही संशोधकांनी काढला आहे.

देश-विदेशातील संशोधकांनी केलं संशोधन : टाकळीभान इथल्या मंदिरातील विठ्ठलमूर्ती ही महाराष्ट्रातील एकमेव चतुर्भुज विठोबा मूर्ती मानली जाते. हे रूप म्हणजे भगवान विठ्ठल आणि भगवान विष्णू या दोघांचं अद्वितीय एकत्रीकरण आहे. पंढरपूरप्रमाणेच इथंही आषाढी उत्सव प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. या मूर्तीवर देशातील आणि विदेशातील अभ्यासकांनी संशोधन केलं असून निवृत्त शिक्षण उपसंचालक विष्णू जोशी, इतिहास संशोधक सुरेश जोशी, लेखक ग.दि. माडगूळकर, रा. चिं. ढेरे आणि दमा शंकर पाटील आणि अमेरिकन अभ्यासक डॉ. एन. फेडहाऊस यांनी या मूर्तीचं महात्म्य विस्तृतपणं स्पष्ट केलं आहे.

मंदिराची बांधणी आणि ऐतिहासिक रचना : टाकळीभान गावाच्या मध्यभागी एका उंचवट्यावर असलेलं हे मंदिर 1977 साली झालेल्या जीर्णोद्धारानंतर सध्याच्या स्वरूपात आहे. संपूर्ण मंदिर हेमाडपंती शैलीचं असून त्यावर सुंदर कोरीव नक्षीकाम केलेलं आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे या मंदिराचं स्वरूप असून अंतराळातील दोन कोरीव खांबांच्या शेजारी हनुमंत आणि गरुडदेव यांची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम असून गर्भगृहातील चौथऱ्यावर विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती विराजमान आहेत.

संत अभंगांमध्ये जणू टाकळीभानचाच विठोबा : टाकळीभानच्या विठोबाचे रूप संतांच्या अभंगांमध्ये दिसून येतं. संत भानुदास म्हणतात "चतुर्भुज मूर्ती लावण्य रूपडे, पाहता आवडे जीवा बहू वैजयंती माळा, कीरीट कुंडले, भूषण मिरवले मकराकार." संत ज्ञानेश्वर म्हणतात "संत भेटी आज मज, तेणे झाला चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थळी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या." तर संत नामदेव म्हणतात चतुर्भुज विठ्ठल, कै देखोन डोळा, भक्तांचा जिव्हाळा, जीव माझा." या अभंगात वर्णन केलेली मूर्ती हीच असावी का? की हे संतांचे भावविश्व आहे. यावर निश्चित बोलता येणार नाही. पण टाकळीभानमधील चतुर्भुज मिशीवाला विठोबा मात्र आजही श्रद्धेनं उभा आहे हे नक्की.

भानू राजानं देवस्थानाला दिली 90 एकर जमीन : या मंदिरासाठी यादव राजानं त्याकाळी 90 एकर जमीन देवस्थानाला दिली होती. आजही ही जमीन देवस्थानकडं असून जमिनीचा सांभाळ देवळालकर कुटुंबीय करते. या जमिनीमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून मंदिराचा दैनंदिन खर्च आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. देवळालकर कुटुंबीय गेल्या आठ पिढ्यांपासून या मंदिरात पूजाअर्चा करत असून सध्या नववी पिढीही याच सेवेचं व्रत घेत आहे.

आषाढी उत्सव आणि अन्नदान परंपरा : आषाढ शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा दरम्यान इथं मोठा उत्सव साजरा होतो. मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई केली जाते. दररोज ग्रामस्थांच्या वतीनं अन्नदान होते. भक्तिभाव आणि एकोप्याच्या वातावरणात वर्षानुवर्षे ही परंपरा अखंड सुरू आहे. टाकळीभानचा चतुर्भुज विठोबा मिशी असणारे महाराष्ट्रातील एकमेव आहे. मिशीवाला आणि चैतन्यानं भारलेलं विठ्ठलरूप भक्तांच्या मनात गाभाऱ्यातून थेट पोहोचणारं आहे.



https://www.etvbharat.com/mr/!state/ashadi-ekadashi-vari-2025-do-you-know-about-moustachioed-vitthal-maharashtra-news-mhs25062003541

परीसराचेग्रामदैवत आसलेल्या शंभु महादेवाचे पुरातन सुमारे पाचशे वर्षापुर्वीचे हेंबाडपंथी मंदिर आहे.मंदिराचे संपूर्ण बांधकाम मोठमोठ्या दगडी शिळांमध्ये करण्यात आलेले आहे.बांधकामासाठी अत्यंत बेमालुम पणे चुण्याचा वापर केला इसल्याने शिळावर शिळा मांडुन भव्य मंदिर बांधल्याचा भास होतो.तात्कालीन वास्तु विशारदाचे त्यामुळे कौतुक केले जाते.त्या काळातही निर्माण केलेला वास्तु कलेचा हे मंदिर म्हणजे एक उत्तम नमुना आहे.

सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात याञौत्सव साजरा केला जातो.दोन दीवस चालणाऱ्या या याञौत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.सोमवारी सकाळी ६ ते ७ या वेळेत भव्य गंगाजल मिरवणुक.या मिरवणुकित शेकडो तरुण सहभागी होवुन गंगाजल घेवुन येतात.वाजत गाजत व फटाक्यांच्या आताषबाजीत मिरवणुक काढली जाते.सकाळी ७ ते १२ प्रवरासंगम येथील पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली लघुरुद्रा भिषेक, १२ वाजता दुग्धाभिषेक, सायंकाळी ७ वाजता शोभेच्या दारुची मनमोहक अताषबाजी, राञी ८ ते ९ ग्रंथाची छबीना मिरवणुक तर राञी ९ ते १२ मोफत लोकनाट्याचा कार्यक्रम. मंगळवारी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम.दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत जिल्हाभरातुनव जिल्ह्याच्या बाहेरून आलेला नामवंत मल्लांचा भव्य कुस्त्यांचा हगामा.राञी ८ ते ११ वाजेपर्यंत म्युझिक मेकर्स यांचा दीमाखदार संगित रजनीचा कार्यक्रम .या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आसल्याने याञौत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →