झिम्बाब्वे अ क्रिकेट संघाने मे २०२२ दरम्यान तीन २०-२० सामने आणि तीन लिस्ट - अ सामने खेळण्यासाठी नेपाळचा दौरा केला. झिम्बाब्वे अ संघाने नेपाळ क्रिकेट संघाबरोबर सदर सामने खेळले.
मूलत: लिस्ट-अ मालिकेपासून दौऱ्याला सुरुवात होणार होती. परंतु ३० एप्रिल रोजीचा नियोजित पहिला लिस्ट-अ सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. तदनंतर ट्वेंटी२० मालिका पहिली खेळवली गेली. झिम्बाब्वे अ ने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात पावसाचा पुन्हा एकदा व्यत्यय आल्याने अनिर्णित राहिला. नेपाळने तिसऱ्या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवत ट्वेंटी२० मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली. नेपाळने लिस्ट-अ मालिका देखील २-१ ने जिंकली.
झिम्बाब्वे अ क्रिकेट संघाचा नेपाळ दौरा, २०२२
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.