झिंगूबाई बोलके या एक मराठी कवयित्री आणि समाजसेविका आहेत.
बोलके यांचा जन्म बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवा या लहान गावी नामदेव तायडे आणि पंचफुला तायडे या दाम्पत्याच्या पोटी १ जुलै १९५५ रोजी झाला. त्या जन्मत:च पायाने अपंग होत्या. शिवाय त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची होती. सबब त्यांचे शिक्षण चौथी पर्यंत झाले. त्यानंतर त्या घर खर्चासाठी आपल्या आईवडिलांना मदत करू लागल्या. त्यांचे वडील कविता करायचे, ज्यामुळे त्या देखील १३व्या वर्षापासून कविता करायला शिकल्या. या कवितांमधून त्या सामाजिक समस्या मांडत असत. अपंग असून देखील अपेक्षा नसताना त्यांचे लग्न श्रावण बोलके यांच्या सोबत झाले.
सुरुवातीला एका महिलेला त्यांनी लिहायला शिकवले आणि समाजात त्यांच्या विरुद्ध असंतोष प्रगटला आणि त्या बेघर झाल्या. त्या गावोगाव फिरत साक्षरता आणि व्यसनमुक्तीवर प्रबोधन करत असत. त्यांनी 'स्वामिनी'अंतर्गत महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी पुण्याच्या मासूम संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरणाचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी सामान्य स्त्रियांचे ५०० बचतगट स्थापन केले. शिवाय अंध, अपंग, कुष्ठरोगी, विधवा, परित्यक्ता महिलांसाठी देखील कामे केली.
झिंगूबाई बोलके
यामागील विज्ञान आणि इतिहास.