के.व्ही. राबिया

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

के.व्ही. राबिया

करीवेप्पिल राबिया (जन्म १९६६) ह्या भारतातील वेल्लीलाक्कडू, मलप्पुरम, केरळ येथील शारीरिकदृष्ट्या विकलांग सामाजिक कार्यकर्त्या आहेत. १९९० मध्ये मलप्पुरम जिल्ह्यातील केरळ राज्य साक्षरता मोहिमेतील भूमिकेमुळे त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या प्रयत्नांना भारत सरकारने विविध प्रसंगी राष्ट्रीय स्तरावर नावाजले. १९९४ मध्ये, भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने त्यांना समाजातील योगदानाबद्दल राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित केले होते. जानेवारी २००१ मध्ये, त्यंना महिलांच्या उद्धार आणि सक्षमीकरणासाठी योगदान दिल्याबद्दल १९९९चा पहिला कन्नगी स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे नारी शक्ती पुरस्कार असे नामांतर करण्यात आले आहे. त्यांना जानेवारी २०२२ मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री प्रदान करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →