झापोरिझिया

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

झापोरिझिया

झापोरिझिया (युक्रेनियन: Запорі́жжя; रशियन: Запоро́жье; पूर्वीचे नावः अलेक्झांद्रोव्स्क) हे युक्रेन देशामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर युक्रेनच्या आग्नेय भागात द्नीपर नदीच्या काठावर वसले असून ते झापोरिझिया ओब्लास्ताचे मुख्यालय आहे.

१९३१ साली बांधून पूर्ण झालेले व जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेले द्नीपर जलविद्युत निर्मिती केंद्र झापोरिझिया येथेच आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →