युक्रेनचे ओब्लास्त

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

युक्रेन देश हा एकूण २४ ओब्लास्त, १ विशेष स्वायत्त प्रदेश (क्राइमिया) व २ केंद्रशासित शहरे (क्यीव व सेव्हास्तोपोल) ह्यांमध्ये विभागला गेला आहे. प्रत्येक ओब्लास्त हा पूढे रायोन आणि ह्रोमाड मध्ये विभागले आहे; रायोनांची संख्या १३६ आहे तर ह्रोमाडांची संख्या १४६९ आहे. जुलै २०२० मधील प्रशासनिक सुधारण्यात ४९० पारंपरिक रायनांपैकी बहुतेक आणि २०२० पूर्वीच्या ११८ प्रादेशिक महत्त्वाच्या शहरांचा समावेश हा एकूण १३६ पुनर्गठित रायनांमध्ये, किंवा युक्रेनमधील जिल्ह्यांमध्ये करण्यात आला.

क्राइमियाच्या (२०१४) आणि आग्नेय युक्रेनच्या रशियन फेडरेशन कडून एकत्रीकरणानंतर (२०२२), क्रिमियाचे स्वायत्त प्रजासत्ताक, सेव्हास्तोपोल तसेच दोनेत्स्क, खेर्सन, लुहान्स्क आणि झापोरिझिया ओब्लास्तांच्या काही भागांवर तत्त्वतः रशियन फेडरेशनचे प्रशासन आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर, बहुसंख्य देशांनी रशियाच्या ह्या दाव्यांना मान्यता दिलेली नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →