जॉन वेन विमानतळ (आहसंवि: SNA, आप्रविको: KSNA, एफ.ए.ए. स्थळसूचक: SNA) अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ऑरेंज काउंटीमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. लॉस एंजेलसपासून जवळ असलेला हा विमानतळ सांता ॲना शहरात आहे. १९७९पूर्वी या विमानतळास ऑरेंज काउंटी विमानतळ असे नाव होते.
हा तळ ऑरेंज काउंटी, लॉस एंजेलस महानगराचा दक्षिण भाग, सांता ॲना, कोस्ता मेसा, न्यूपोर्ट बीच, अर्व्हाइन सह अनेक शहरांना विमानसेवा पुरवतो. २०१५ च्या सुमारास साउथवेस्ट एरलाइन्स, अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि अलास्का एरलाइन्स येथील प्रमुख विमानवाहतूक कंपन्या होत्या.
जॉन वेन विमानतळ
थोडक्यात पण महत्त्वाचे.