जेंतिले दे बेक्की

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

जेंतिले दे बेक्की (१४२०/१४३० - १४९७) हा इटालियन बिशप, मुत्सद्दी, वक्ता आणि लेखक होता. हा फिरेंझेच्या शासक लॉरेंझो इल मॅग्निफिको तसेच त्याचा मुलगा जियोव्हानी दे मेदिची, जो नंतर पोप लिओ दहावा झाला, यांचा शिक्षक होता. याने लॅटिनमध्ये कविता आणि प्रार्थना लिहिल्या.

जेंतिलेचा जन्म उर्बिनो येथे झाला. त्याच्या जन्माचे वर्ष आणि त्याच्या सुरुवातीच्या अभ्यासाचे ठिकाण दोन्ही अज्ञात आहेत.

१४७३ लॉरेंझो दे मेदिची त्याला अरेझोचा बिशप म्हणून प्रस्तावित केले. इतिहासकार सेसिल ग्रेसन यांच्या मते फिरेंझेचे मुख्य बिशप आणि पोप सिक्स्टस चौथा या दोघांनीही त्यांची श्रद्धा, त्यांचे ज्ञान, क्षमता आणि चारित्र्य यांच्याबद्दल उच्च आदर होता.

१९५४मध्ये, पिएरो दि कोसिमो दे मेदिचीने जेंतिलेला लॉरेंझो आणि त्याचा भाऊ जुलियानो या आपल्या मुलांचे शिक्षक म्हणून नेमले. १४६६मध्ये, तो पोप पॉल दुसऱ्याच्या दरबारात लॉरेंझोबरोबर राजनैतिक मोहिमेवर गेला. पुढच्या वर्षी जेंतिले लॉरेंझोचीआई लुक्रेझिया तोर्नाबुओनी सोबत क्लॅरिचे ओर्सिनी आणि लोरेंझोच्या लग्नाची जुळणी करण्यासाठी रोमला, गेला. तेथे त्याने ओर्सिनी कुटुंबाशी लग्नाची बोलणी केली.

१४८९मध्ये लॉरेंझोने आपला दुसरा मुलगा जियोव्हानी दि लॉरेंझो दे मेदिचीचा शिक्षक म्हणून जेंतिलेला नेमले. लॉरेंझोने पोप इनोसंट आठव्याशी केलेल्या करारानुसार त्याला धर्मगुरू करणे अपेक्षित होते. जियोव्हानीला तेराव्या वर्षी कार्डिनल बनवण्यात आले आणि अडतीसव्या वर्षी तो पोप जुलियस दुसऱ्या नंतर पोप लिओ दहावा म्हणून पोपपदी बसला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →