जुहू

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जुहू

जुहू महाराष्ट्रातील मुंबई शहराचे उपनगर आहे. याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, तसेच उत्तरेस वर्सोवा, पूर्वेस सांताक्रुझ आणि विलेपार्ले आणि दक्षिणेस खार ही उपनगरे आहेत. जुहू येथील पुळण (बीच) प्रसिद्ध आहे. येथे शहरातील सर्वाधिक श्रीमंत आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची घरे आहेत. पश्चिम रेल्वे आणि मुंबई उपनगरी रेल्वेची हार्बर रेल्वे वरील सांताक्रुझ, अंधेरी आणि विलेपार्ले ही येथून जवळची रेल्वे स्थानके आहेत. सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन वर्सोवा आहे. जुहूमध्ये बी.ई.एस.टी.चे दोन छोटे बस आगार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →