जुलियानो दे मेदिची

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

जुलियानो दि पिएरो दे मेदिची (२८ ऑक्टोबर, १४५३ - २६ एप्रिल, १४७८) हा चौदाव्या शतकातील इटलीमधील फिरेंझेच्या प्रजासत्ताकाचा शासक होता. पिएरो दि कोसिमो दे मेदिची आणि लुक्रेझिया तोर्नाबुओनी यांचा हा दुसरा मुलगा असून लॉरेंझो दे मेदिचीचा लहान भाऊ होता. त्याने लॉरेंझोबरोबर फिरेंझेचा सह-शासक म्हणून काम केले. 1१४७८मध्ये पाझ्झी षडयंत्रात त्याची हत्या झाली.

जुलियानो अतिशय देखणा होता. अनेक चित्रकार आणि शिल्पकारांना त्याला समोर ठेवून चित्रे काढलेली होती. जुलियानोचा फिओरेत्ता गोरिनी पासून एक अनौरस मुलगा होता. जुलियो दि जुलियानो दे मेदिची नंतर क्लेमेंट सातवा नावाने पोप झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →