जुलियानो दि लॉरेंझो दे मेदिची

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जुलियानो दि लॉरेंझो दे मेदिची

जुलियानो दि लॉरेंझो दे मेदिची (१२ मार्च, १४७९ - १७ मार्च, १५१६) हा सोळाव्या शतकातील इटलीमधील फिरेंझेच्या मेदिची घराण्याचा सदस्य होता. हा लॉरेंझो दे मेदिचीचा तिसरा मुलगा आणि फिरेंझेचा शासक होता.

जुलियानो लॉरेंझो दे मेदिचीचा सगळ्यात लहान मुलगा होता. याचा सगळ्यात मोठा भाऊ पिएरो लॉरेंझोनंतर फिरेंझेचा शासक झाला तर जियोव्हानी हा पोप लिओ दहावा झाला. त्याचा एक चुलत भाऊ जुलियो दि जुलियानो दे मेदिची पुढे पोप क्लेमेंट सातवा झाला.

१९९४मध्ये झालेल्या उठावात पिएरो आणि मेदिची घराण्याची फिरेंझेमधून उचलबांगडी झाली. त्यावेळी जुलियानो व्हेनिसला गेला. पुढे पोप जुलियस दुसरा आणि स्पेनने फ्रेंचांना इटलीतून हाकलून दिल्यावर मेदिची कुटुंब पुन्हा फिरेंझमध्ये सत्तेवर आले. त्यावेळी जुलियानो तेथील शासक झाला. याचवेळी त्याला नेमूर्सचे ड्यूकपद बहाल केले गेले. हा मृत्यूपर्यंत या पदांवर होता.

जुलियानोचा एकमेव अनौरस मुलगा इप्पोलितो दे मेदिची नंतर कार्डिनल झाला.

जुलियानोला फिरेंझेच्या बॅसिलिका दि सान लॉरेंझोमध्ये आपले काका जुलियानो आणि इतर मेदिची सत्ताप्रमुखांबरोबर दफन केले गेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →