पाझ्झी षडयंत्र

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

पाझ्झी षड्यंत्र हे इटलीमधील फिरेंझे शहरातील मेदिची कुटुंबाला सत्तेवरून दूर करण्यासाठीचे तेथील पाझ्झी कुटुंबातील काही सदस्य आणि इतरांनी केलेला डाव होता. रिनैसाँ कालीन फिरेंझेत रचलेल्या या कटाला पोप सिक्स्टस चौथ्याची संमती होती. अंती हा कट फसला आणि त्यापश्चात षडयंत्रकारांना मोठी किंमत मोजावी लागली.

२६ एप्रिल, १४७८ रोजी गिरोलामो रियारियो, फ्रांचेस्को साल्व्हियेती आणि फ्रांचेस्को दे पाझ्झी यांनी फिरेंझेमधील कॅतेद्राले दि सांता मारिया देल फियोरे या चर्चमध्ये शहराचा अनभिषिक्त शासक लॉरेन्झो दे मेदिची आणि त्याचा भाऊ जुलियानो यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. यात जुलियानो जागेवरच मारला गेला तर लॉरेंझोने जखमी अवस्थेत तेथून पळ काढला.

त्यानंतर कट रचणाऱ्यांना आणि संशयितांना मृत्युदंड देण्यात आला. यातील काहींना तर पलाझ्झो देल्ला सिन्योरियासारख्या उंच इमारतींच्या खिडक्यांमधून फाशीला लटकाविण्यात आले. अशा एकूण ८० व्यक्तींना मृत्युदंड दिला गेला आणि उरलेल्या पाझ्झींना फिरेंझेमधून हद्दपार करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →