जिल ट्रेसी जेकब्स बायडेन (३ जून, १९५१:हॅमन्टन, न्यू जर्सी, अमेरिका - ) या एक अमेरिकन शिक्षणतज्ञ आहेत. या २०२१ ते ०२५ दरम्यान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची पत्नी म्हणून अमेरिकेच्या प्रथम महिला होत्या. जिल बायडेन २००९-२०१७ दरम्यान त्यांचे पती उपराष्ट्राध्यक्ष असताना अमेरिकेच्या द्वितीय महिला होत्या. जिल बायडेन २००९पासून नॉर्दर्न व्हर्जिनिया कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्लिशच्या प्राध्यापिका आहेत. या पगारदार पदावर असलेल्या अमेरिकेच्या पहिल्याच प्रथम किंवा द्वितीय महिला आहेत.
बायडेन उच्चशिक्षित असून त्यांनी डेलावेर विद्यापीठातून इंग्लिशमध्ये पदवी, शिक्षणात पदव्युत्तर पदवी आणि वेस्ट चेस्टर युनिव्हर्सिटी आणि व्हिलानोव्हा विद्यापीठातून इंग्लिशमध्ये पदव्युत्तर पदव्या मिळवल्या आहेत. यानंतर त्या शिक्षणातील पी.एचडी. पदवीसाठी डेलावेर विद्यापीठात परतल्या आहे. त्यांनी तेरा वर्षे हायस्कूलमध्ये (इयत्ता ९-१२) इंग्लिश आणि वाचन शिकवले. याशिवाय मनोरुग्णालयातील भावनिक अपंगत्व असलेल्या किशोरवयीन मुलांना त्यांनी शिकवले. त्यानंतर त्या पंधरा वर्षे,ती डेलावेर टेक्निकल अँड कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्लिश आणि लेखन प्रशिक्षक होत्या.
जिल बायडेन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.