मेलानिया ट्रम्प

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मेलानिया ट्रम्प (२६ एप्रिल, १९७०:नोव्हो मेस्तो, स्लोव्हेनिया, युगोस्लाव्हिया - ) या स्लोव्हेनियन-अमेरिकन मॉडेल आणि धंदेवाईक महिला आहे. या डॉनल्ड ट्रम्प यांच्या पत्नी म्हणून २०१७-२०२१ दरम्यान अमेरिकेच्या प्रथम महिला होत्या.

मेलानिया ट्रम्पचे लहानपण स्लोव्हेनिया (तेव्हा युगोस्लाव्हियाचा भाग) मध्ये गेले. त्यांनी मिलान आणि पॅरिस तसेच १९९६ पासून न्यू यॉर्क शहरात फॅशन मॉडेल म्हणून काम केले. २००५मध्ये त्यांनी दूरचित्रवाणी व्यक्तिमत्व आणि स्थावर मिळकतींचा व्यापारी डॉनल्ड ट्रम्प यांच्याशी लग्न केले. त्यांना २००६मध्ये बॅरॉन नावाचा मुलगा झाला. त्यानंतर लगेचच त्यांनी अमेरिकन नागरिकत्व घेतले लुईसा अॅडम्स नंतर अमेरिकेत न जन्मलेल्या त्या दुसऱ्या अमेरिकन प्रथम महिला तर इंग्लिश मातृभाषा नसलेल्या पहिल्या आहेत.

आपल्या पतीची सद्दी संपल्यानंतर मेलानिया ट्रम्प सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →