जोसेफ रॉबिनेट बायडेन, जुनियर (इंग्लिश: Joseph Robinette "Joe" Biden Jr.; २० नोव्हेंबर, १९४२:स्क्रॅन्टन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) हे एक अमेरिकन राजकारणी व देशाचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत. ९ नोव्हेंबर, २०२० रोजी बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून गेले. ते २० जानेवारी, २०२१ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष आहेत.
२००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासोबत निवडून आल्यानंतर २०१२ साली ओबामा- बायडेन यांनी विजय मिळवून सत्ता राखली. उपराष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी बायडेन १९७३ ते २००९ डेलावेर राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. सेनेटमधील आपल्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत बायडेन अनेक समित्यांचे अध्यक्ष होते. १९९८ व २००८ साली बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले परंतु दोन्ही वेळा ते अपयशी ठरले.
बायडेन यांनी २०१६ सालच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत भाग घेतला नाही. २०२० सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत बायडेन जिंकले.
ज्यो बायडेन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.