बराक ओबामा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बराक ओबामा

बराक हुसेन ओबामा ( ऑगस्ट ४, १९६१) हे अमेरिकेचे ४४वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी जानेवारी २०, २००९ रोजी पदग्रहण केले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ४, २००८ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर जॉन मॅककेन ह्यांचा ३६५ विरुद्ध १६५ मतांनी पराभव केला. २०१२ साली पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ६, २०१२ रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर मिट रॉम्नी ह्यांचा ३०२ विरुद्ध २०३ मतांनी पराभव केला. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ते इलिनॉय ह्या राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांनी सेनेटर जोसेफ बायडेन ह्यांची निवड केली. ओबामा हे अमेरिकेच्या शिकागो ह्या शहराचे निवासी आहेत.

९ ऑक्टोबर, २००९ रोजी त्यांनी जागतिक शांततावाढीसाठी व अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानासाठी ओबामांना २००९ सालचे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. ८ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर राहिल्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये ओबामांनी नवे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प ह्यांच्याकडे सत्ता सुपूर्त केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →