रवी कपूर उर्फ जितेंद्र ( जन्म :७ एप्रिल, १९४२), हे एक ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते असून, १९५९ पासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. ते बालाजी टेलिफिल्म्स आणि बालाजी मोशन पिक्चर्सचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात. रोमँटिक हिरो म्हणून जितेंद्र यांची ओळख आहे.
जितेंद्रचा जन्म पंजाबी खत्री कुटुंबात अमृतसर, पंजाब येथे रवी कपूर म्हणून अमरनाथ आणि कृष्णा कपूर या जोडप्याच्या पोटी झाला. त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. हे दागिने चित्रपट उद्योगाला पुरवठा केले जात असत. त्यांनी आपला मित्र राजेश खन्ना यांच्यासोबत गिरगाव, मुंबई येथील सेंट सेबॅस्टियन गोवन हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण आणि मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. व्ही. शांताराम यांना दागिन्यांचा पुरवठा करताना, त्यांनी १९५९ च्या नवरंग चित्रपटात संध्या सोबत दुहेरी भूमिकेत प्रथम काम केले होते. त्यानंतर त्यांनी परत कधी मागे वळून पाहिले नाही.
जितेंद्र
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!