जिओ सिनेमा ही एक भारतीय सबस्क्रिप्शन व्हिडिओ ऑन-डिमांड ओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्रवाह सेवा आहे. ही सेवा टीव्ही१८ च्या (TV18) व्हायकॉम१८ (Viacom18) या उपकंपनीच्या मालकीची आहे. ५ सप्टेंबर २०१६ रोजी सुरू झालेल्या जिओ सिनेमाच्या आशय ग्रंथालयात चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, वेब मालिका, संगीत व्हिडिओ, माहितीपट आणि क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये जिओ सिनेमा आणि व्हेकॉम१८ मधील विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, व्हेकॉम१८ ने आपला सर्व क्रीडा आशय 'वूट' (Voot) वरून जिओ सिनेमावर स्थानांतरित केला. त्यानंतर हे प्लॅटफॉर्म नेटवर्कचे अधिकृत डिजिटल क्रीडा केंद्र झाले. हे मोबाईल उपयोजन (ॲप) अँड्रॉइड आणि आयओएस उपकरणांसाठी उपलब्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जिओसिनेमा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.