रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड ही LTE (Long Term Evolution) सेवा देणारी व भारतात जिओ या व्यवसायी नावाने बिनतारी संदेशवहन करणारी कंपनी आहे. ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय नवी मुंबई येथे आहे. या कंपनीकडे २जी/३जी प्रकारचे जाळे नसून ही कंपनी पूर्णपणे ४जी (फोर्थ जनरेशन) सेवा देते. ही कंपनी भारतातील एकूण २२ टेलिकॉम विभागांत १००% व्हॉईस ओव्हर एलटीई चालविते.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे जनक धीरूभाई अंबानी यांच्या ८३ व्या वाढदिवशी, म्हणजे (२७ डिसेंबर, इ.स. २०१५) या तारखेला जिओचे उद्घाटन झाले. त्यानंतर त्यांची आम जनतेसाठीची व्यावसायिक सेवा ५ सप्टेंबर, २०१६ रोजी सुरू झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुख्य मालक मुकेश अंबानी यांचे रिलायन्स जिओ ही दूर संचार सेवा आहे. संजय मश्रूवाला हे जिओचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य ज्योतींद्र ठक्कर आहेत. मुकेश अंबानी हे मुख्य व्यूहकार आहेत.
जिओ
या विषयातील रहस्ये उलगडा.