जास्वंद

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

जास्वंद

जास्वंद ही एक फुले देणारी बहुवार्षिक वनस्पती आहे.



इतर नावे: हरिवल्लभ, जयपुष्पी, रक्तपुष्पी, रुद्रपुष्पी, जपा(संस्कृत), अरुणा, जासुम, जवाकुसुम, रोझेला, जमेका सॉरेल, शू-फ्लॉवर, चायना ही नावे आहे.

भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडुप स्वरूपात असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानांत उठून दिसतात. जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्‍या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते. असे म्हणले जाते की श्री गणेशाला इतर फुलांपेक्षा जास्वंदीचे फुल प्रिय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →