फूल

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

फूल

फूल हे फुलझाडांमधील प्रजननाचा अवयव आहे. फुलामध्ये पुंकेसर व स्त्रीकेसर असतात व कीटकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक, रंगीबेरंगी पाकळ्या असतात. काही फुलांमध्ये मध देखील असतो. फुलांचा छान वास येतो. फूल हे आकर्षित असते त्यामुळे ते लोकांना आवडते. फूल झाडाच्या स्त्री व पुरुष बीजाचे मीलन घडवून आणण्यास मदत करते व त्यानंतर फळाची निर्मिती होते. फुलांचा उपयोग देवासाठी, केसात माळण्यासाठी, त्योहारासाठी करतात. वेगवेगळ्या देवाला वेगवेगळी फुले अरपण केली जातात, अनेक फुलांच्या समूहाला फुलोरा असे म्हणतात.



अनंत काळापासून फुलणारी विविधरंगी, विविधढंगी फुले आपल्या सौंदर्याने केवळ पशुपक्ष्यांना आणि किंटकांनाच नव्हे तर माणसालाही नेहमीच मोहात पाडत आली आहेत. काही फुलांचा रंग, काहींचा आकार, तर काहींचा सुगंध तर काहींचे सगळेच गुण निसर्गातील विविध घटकांना आकर्षित करणारे असतात. शास्त्रीयदॄष्ट्या फूल म्हणजे वनस्पतींचे पुनरुत्पादनाचे रचनात्मक अवयव होय. अंकुराचा मुख्यत्वेकरून पुनरुत्पादनाकरिता रूपांतरीत भाग.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →