ताम्हण (किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae) हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो. चांगली उंच वाढणारी झाडे फणसाडच्या व रत्नागिरीच्या जंगलात दिसतात. मुंबईत अनेक ठिकाणी ही झाडे दिसतात. हा फुले देणारा वृक्ष आहे. या वनस्पतीला फुले साधारणपणे १ मेच्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिना काळात येत असल्याने =याचे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे. तामणाचे फूल लालसर-जांभळ्या रंगामुळे ओळखले जाते. मूळचे उपखंडातील असणारे हे फूल आपल्या लावण्यगुणांमुळे आता युरोप-अमेरिकेतही पोचले आहे . भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी तामणाचे वृक्ष वाढतात. कोकणात या वृक्षाला 'मोठा बोंडारा' असे म्हणतात.
कोकणात सर्वत्र नदी-नाल्यांच्या काठांवर, बंगाल, आसाम, म्यानमार, दक्षिण भारत, अंदमान निकोबार आणि श्रीलंकेतील जंगलांमध्येही ते आढळतात. सर्वसाधारणपणे हा वृक्ष मध्यम आकाराचा, गोलसर, डेरेदार, पर्णसंभाराने शोभिवंत दिसतो.
लहान झाडालाही फुले येतात. तामण हा रस्त्याच्या कडेने सावलीसाठी लावण्यास उत्तम वृक्ष आहे.
ताम्हण
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?