जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२

थोडक्यात पण महत्त्वाचे.

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२ यातील सामने हे २०१०चा जागतिक विश्वविजेता भारताचा विश्वनाथन आनंद आणि इस्त्रायलचा कॅंडीडेट्स टुर्नामेंट विजेता बोरीस गेलफंड यांच्यात खेळवले गेले. या स्पर्धेची सुरुवात दिनांक १० मे, २०१२ रोजी होऊन पूर्वनिर्धारीत वेळापत्रकानुसार हे सामने दिनांक ३० मे, २०१२ रोजी संपले. हे सामने रशियाच्या मॉस्को शहरातील स्ट्रेट ट्रेटीअकोव गॅलरीत खेळवले गेले. या स्पर्धेत विश्वविजेत्या ठरणाऱ्या खेळाडूला २.५५ दशलक्ष अमेरीकन डॉलरचे बक्षिस जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून दिले जाते.

सुरुवातीच्या बारा सामन्यात ६-६ अशी दोन्ही खेळाडूत बरोबरी राहिल्याने जलद फेरीचे चार अतिरीक्त टाई ब्रेकर सामने खेळवले गेले ज्यात विश्वनाथन आनंदने २½ - १½ अशी आघाडी घेऊन विश्वविजेतेपद कायम राखले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →