चेसक्यूब.कॉम (इंग्लिश: chesscube.com) जगभरातील लोकांना ऑनलाईन बुद्धिबळ हा खेळ उपलब्ध करून देणारे आंतरजालावरील एक संकेतस्थळ आहे. याची सुरुवात मार्क लेविट्ट याने २००७ साली केली. मार्च २०११ पर्यंत या संकेतस्थळावरील नोंदणीकृत सदस्यांची संख्या १४,००,००० होती.
खेळाबरोबरच हे संकेतस्थळ सदस्यांना ऑनलाईन संवाद आणि चलचित्र सेवाही पुरविते.
चेसक्यूबची थेट बुद्धिबळ विकास प्रणाली ॲडॉब फ्लेक्स तंत्रज्ञानावर आधारीत आहे. चेसक्यूबचे वापरकर्ते जगभरातल्या जवळपास २०० देशातून आहेत.
चेसक्यूब
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.