जर्मनी महिला क्रिकेट संघाचा ग्रीस दौरा, २०२५

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

जर्मनी महिला क्रिकेट संघाचा ग्रीस दौरा, २०२५

जर्मनी महिला क्रिकेट संघाने मे २०२५ मध्ये चार महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी ग्रीसचा दौरा केला. दौऱ्यातील सर्व सामने मरीना मैदान, कोर्फू येथे खेळवण्यात आले.

महिला टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी ९ मे २०२५ रोजी दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी१० मालिका खेळवण्यात आली. जर्मनीने पहिला सामना नऊ गडी राखून, दुसरा सामना २९ धावांनी आणि तिसरा सामना २८ धावांनी जिंकत टी१० मालिका ३–० अशी जिंकली.

चार सामन्यांची महिला टी२० आंतरराष्ट्रीय मालिका १० आणि ११ मे २०२५ रोजी खेळवण्यात आली. जर्मनीने पहिला सामना १०५ धावांनी, दुसरा सामना ६६ धावांनी, तिसरा सामना ८९ धावांनी आणि चौथा सामना दहा गडी राखून जिंकत मालिका ४–० अशी जिंकली.

जर्मनीच्या क्रिस्टिना गॉफने मालिकेत सर्वाधिक १०८ धावा केल्या आणि तिला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. ग्रीसच्या अदामांतिया माक्रीने आपल्या संघासाठी सर्वाधिक ६९ धावा केल्या. जर्मनीच्या जेनेट रोनाल्ड्सने सर्वाधिक सहा बळी, तर ग्रीसच्या सोफिया जॉर्जोटाने सर्वाधिक चार बळी घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →