जयप्रकाश नारायण विमानतळ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

जयप्रकाश नारायण विमानतळ

लोकनायक जयप्रकाश विमानतळ किंवा जयप्रकाश नारायण विमानतळ (आहसंवि: PAT, आप्रविको: VEPT) हा भारत देशाच्या बिहार राज्याच्या पाटणा शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मार्च २०१४ मध्ये प्रवाशांच्या संख्येबाबतीत हा विमानतळ बिहारमधील सर्वात वर्दळीचा तर भारतामध्ये २१व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता.

स्वातंत्र्यसैनिक जयप्रकाश नारायण यांचे नाव दिला गेलेला हा विमानतळ पाटणा शहराच्या नैर्ऋत्येस ४ किमी अंतरावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →