जय संतोषी मा हा १९७५ चा एक भारतीय हिंदी भाषेतील भक्तीपट आहे, ज्याचे दिग्दर्शन विजय शर्मा यांनी केले असून लेखन आर. प्रियदर्शी यांनी केले आहे. संतोषी माता ही समाधानाची देवी आहे. या चित्रपटाची गाणी उषा मंगेशकर, महेेंद्र कपूर, मन्ना डे आणि प्रसिद्ध कवी कवी प्रदीप, यांनी गायले असून कवी प्रदीप यांनी गाण्यांचे बोल लिहिले होते. कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला आणि त्या काळी ६७ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जय संतोषी मा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.