जन गण मन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जन गण मन

जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत भारतो भाग्यो बिधाता या नावाने रचले होते. याची शैली साधू बंगाली किंवा तत्सम बंगालीमध्ये असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे. भारतो भाग्यो बिधाता या रचनेचा पहिला श्लोक भारतीय संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला.

राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला अंदाजे ५२ सेकंदांचा वेळ लागतो. पहिल्या आणि शेवटच्या ओळींचा समावेश असलेली एक लहान आवृत्ती देखील (जिला सुमारे २० सेकंद लागतात) कधीकधी गायली जाते.



भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम हे गीत सार्वजनिकपणे पहिल्यांदा २७ डिसेंबर १९११ रोजी गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा संस्कृत भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →