बंगाली (बंगाली लिपीत: বাংলা ভাষা; लिप्यंतरण: बांला भाषा) ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात आणि बांग्लादेशात बोलली जाणारी भाषा आहे.
संस्कृत, पाली व प्राकृत या भाषांमधून बंगाली भाषेचा जन्म झाला. बंगाली बंगाल नामक प्रदेशात बोलली जाणारी भाषा असून, या प्रदेशात सध्याचा बांग्लादेश व भारतातील पश्चिम बंगाल राज्य यांचा समावेश होतो. बंगाली भाषिकांची एकूण संख्या २३ कोटीच्या आसपास असून, जगातील सर्वाधिक प्रचलित भाषांमध्ये मोडते. (भाषिक संख्येनुसार जगभरात पाचवी). बंगाली बांग्लादेशातील प्रमुख भाषा असून भाषिक संख्येत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. बंगाली व आसामी भाषा भाषा इंडो-इराणी भाषाकुळातील भौगोलिकदृष्ट्या सर्वांत पूर्वेकडच्या भाषा आहेत.
बंगाली भाषा १,४०० हून अधिक वर्षांमध्ये विकसित झाली आहे. हजार वर्षांहून अधिक जुन्या साहित्यिक इतिहासासह बंगाली साहित्याचा बंगाल पुनर्जागरणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आणि ते आशियातील सर्वात समृद्ध व विविध साहित्यपरंपरांपैकी एक मानले जाते. १९४८ ते १९५६ दरम्यान बंगालीला पाकिस्तानची अधिकृत भाषा बनविण्याची मागणी करणाऱ्या बंगाली भाषा आंदोलनामुळे पूर्व बंगालमध्ये बंगाली राष्ट्रवादाला चालना मिळाली आणि त्यातून १९७१ मध्ये बांगलादेशाचा उदय झाला. १९९९ मध्ये, भाषिक आंदोलनाच्या सन्मानार्थ युनेस्कोने २१ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून मान्यता दिली.
भारत सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी बंगाली भाषेला अभिजात (Classical) भाषेचा दर्जा प्रदान केला. २०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, हिंदी, काश्मीरी, गुजराती आणि मैतेई (मणिपुरी) भाषांनंतर बंगाली ही भारतातील दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी आणि पाचवी सर्वात वेगाने वाढणारी भाषा आहे.
बंगाली भाषेचा विकास १,४०० हून अधिक वर्षांमध्ये झाला आहे. हजार वर्षांहून अधिक जुना साहित्यिक इतिहास असलेले बंगाली साहित्य बंगाल पुनर्जागरणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आणि ते आशियातील सर्वात समृद्ध व विविध साहित्यपरंपरांपैकी एक मानले जाते. १९४८ ते १९५६ दरम्यान झालेल्या बंगाली भाषा आंदोलनाने बंगालीला पाकिस्तानची अधिकृत भाषा बनवण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे पूर्व बंगालमध्ये बंगाली राष्ट्रवादाला चालना मिळाली आणि त्यातून १९७१ मध्ये बांगलादेशाचा उदय झाला. १९९९ मध्ये, भाषिक आंदोलनाच्या सन्मानार्थ, युनेस्कोने २१ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून मान्यता दिली.
बंगाली भाषा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.