छिंगदाओ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

छिंगदाओ

छिंगदाओ (देवनागरी लेखनभेद : क्विंगदाओ) हे चीन देशातील पूर्वेच्या षांतोंग प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर पिवळ्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून चीन सरकारच्या महत्त्वाकांक्षी ओबोर नावाच्या जागतिक प्र्कल्पामधील ते एक प्रमुख केंद्र मानले जाते. आजच्या घडीला ते चीनमधील एक प्रमुख बंदर, चिनी आरमाराचे तळ तसेच पूर्व चीनमधील एक मोठे आर्थिक व वाणिज्य केंद्र आहे. २०२० साली छिंगदाओ शहराची लोकसंख्या सुमारे ५८ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १ कोटी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →